शिक्षणातून व्यक्तिमत्त्व घडविण्याचा आमचा प्रयत्न
गुरुकुल विद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता त्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता, आत्मविश्वास, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यावर भर दिला जातो.
प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे आणि त्याच्या क्षमतेनुसार त्याला योग्य संधी व मार्गदर्शन मिळावे, हा आमच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग आहे.
