ज्ञान, संस्कार, माणुसकी आणि सद्विचारांनी विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणारी आमची प्रेरणादायी प्रार्थना.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात माणुसकी, सद्भावना आणि सद्विचार रुजविणारी प्रार्थना
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे,
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे,
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले,
पाउले चालो पुढे... जे थांबले ते संपले,
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे